चंद्रपूर -
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने नुकताच पत्रकारांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील दै. पुण्यनगरीचे पत्रकार अमर बुध्दारपवार यांना ” ग्रामीण वार्ता " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पत्रकार अमर बुध्दारपवार यांनी शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेलेला जिल्हयाचा भूषण ठरणारा हुमन प्रकल्पाच्या रखडलेल्या परिस्थितीवर विशेष लेखासोबत ग्रामीण भागातील समस्या , परिसराच्या विकासाबाबतील समस्या , सुशिक्षित बेरोजगार , शेतकरी , शेतमजूर गोरगरिब जनतेला न्याय मिळेल अशा लेखनासह निर्भिडपणे विविध विषयावर लिखन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. विशेष लेखनीकरीता त्यांची पुरस्काराने गौरव करण्यात आला. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ व चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ यांचे वतीने आयोजित पत्रकार पुरस्कारानी सातव्यांदा गौरविण्यात आले .
हेही वाचा
गोळीबारात कुख्यात गुंड हाजी अली यांचा मृत्यू
विविध विषयावरील लिखान करून अन्यायाला वृत्तपत्रातून वाचा फोडण्याचे कामासह सुशिक्षित बेरोजगारी, शेतकरी व शेतमजूर , गोर - गरिब जनतेच्या व्यथा मांडून शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर विशेष निर्भिडपणे लिखान करून सन 2012, सन 2013 ,सन 2014 ,सन 2015 , सन 2019 , सन 2022 मध्ये जिल्हा स्तरावर यापूर्वी सहावेळा पुरस्काराचे मानकरी ठरले असल्याने जिल्हास्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . यावर्षी सुद्धा सोशल मिडीयाद्वारे सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या युवकांच्या रक्तदानाचे उपक्रमाच्या लिखाणावर सातव्यांदा अमर बुद्धारपवार यांना वर्ष सन 2024 चा ग्रामीण वार्ता पुरस्कार चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या आयोजित सत्कार कार्यक्रमात ग्रामीण वार्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. त्यावेळी जेष्ठ उपसंपादक दै . हितवादचे कार्तिक लोखंडे व पत्रकार संघाचे पदाधिकारी तथा पुरस्कार प्राप्त जेष्ठ पत्रकार व श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी, बहुसंख्य पत्रकार तथा जिल्हयातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
दै . पुण्यनगरीचे प्रतिनिधी अमर बुध्दारपवार यांना ग्रामीण वार्ता पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आल्याने पत्रकार मित्रपरिवार , सामाजिक संघटक ,आप्तेष्ठ तथा मित्रपरिवारांनी बुध्दारपवार यांचे अभिनंदनपर शुभेच्छा देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .