चंद्रपूर; येथील कादंबरी लेखक पवन भगत यांची कादंबरी "ते पन्नास दिवस" भारत सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत मराठी भाषा तज्ञ् समिती च्या शिफारशीने अहमदनगर येथील छ्त्रपती शिवाजी महाराज स्वायत्ता विद्यापीठात बी. ए. द्वितीय वर्गाच्या अभ्यासक्रमात 2024 पासून समाविष्ट करण्यात आली असल्याचे मराठी भाषा तज्ञ् समिती ने एका पत्राद्वारे पवन भगत यांना कळविले आहे.
हेही वाचा
ते पन्नास दिवस या कादंबरीतील लेखणीचे केंद्राबिंदू हा माणूस असल्याने जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतावाद स्थापित करण्यासाठी निच्छितच विध्यार्थ्यांना मदत होईल. असे अभिनंदन करतांना खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शुभेच्छा देऊन विचार व्यक्त केले. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले.
तसेच काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी अभिनंदन केले असून. जेष्ठ साहित्यिक इसा भडके, कोमल खोब्रागडे, अशोक निमगडे, विनोद दत्तात्रय, राजू झोडे, सिद्धार्थ वाघमारे, राजेंद्र वैद्य,जितेंद्र डोहणे यांनी अभिनंदन केले असून पवन भगत यांना पुढील लेखन वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.