आज राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भस्तरीय बैठक नागपुरात



विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व विदर्भात होत असलेल्या वर्धापन दिनाच्या तयारी करण्यासाठी, विदर्भ  प्रदेश कार्यकारिणी नियुक्त करण्यासाठी नागपूर येथील आमदार निवास विंग नंबर १,३ मजला,रुम नंबर ३१८,मध्ये दि.२०/७/२०२४ रोजी दुपारी २ वाजता घेण्यात येत आहे.या बैठकिला विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे 


राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री मा.आमदार राष्ट्रनायक मा.महादेवराव जानकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विवीध नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापन दिन साजरी होत आहे.यासाठी मा.काशिनाथ( नाना) शेवते -प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, मा.ज्ञानेश्वर (माऊली) सलगर- मुख्य महासचिव महाराष्ट्र राज्य मा .एस एल अक्कीसागर राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय समाज एम्प्लाइज फेडरेशन, राष्ट्रीय महासचिव सुशिलकुमार पाल,लेंगे मामा ,गोवींदराम सुरनर संघटक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ अध्यक्ष डॉ तौसीफ शेख, विदर्भ महासचिव संजय कन्नावार,राजु गोरुडे, वाहतूक आघाडी महासचिव अनुप यादव, प्रदेश कार्यकारणी सदस्य नाना भाऊ देशमुख ,ॲड संतोष कोल्हे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रमाकांत यादव,गणेश मानकर, अकोला जिल्हाध्यक्ष दादाराव ढगे,दिपक तिडके, प्रदीप गाव़डे, चंद्रपूर जिल्हाध्यक्षा वंदना गेडाम, अमरावती जिल्हाध्यक्ष किरण होले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुरज ठाकूर ,वर्धा जिल्हाध्यक्ष संजय मेघे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर डोईफोडे,सुनील शेन्डे, शिवदास अक्कलवार प्रा.विठ्ठल गिरवलकर,मा.प्नवक्ता नफिस शेख आदी परीश्रम घेत आहेत.