सेवाभावी वृत्तीचे मुनगंटीवार यांच्या जन्मदिन सेवा पंधरवडा !



30 जुलै हा राज्याची वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस ! ३० जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्याचे आव्हान भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे. राज्यात सर्वदूर आणि विशेषता चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या सतत धार पावसामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती लक्षात घेता गरजवंतांना आरोग्यसेवा तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाटप करून पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या वाढदिवस साजरा करण्यात यावा आणि त्या माध्यमातून त्यांच्या दीर्घायुव रोग्यासाठी तसेच त्यांना जनसेवेसाठी ऊर्जा मिळावी यासाठी प्रार्थना करण्यात यावी असे आवाहन नुकतीच झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र महानगर अध्यक्ष राहुल पावडे माजी जिल्हाध्यक्ष तथा राजुरा विधानसभेचे प्रमुख देवराव भोंगळे यांनी जाहीर केले. 



सेवाभावी वृत्ती म्हणजे सुधीर मुनगंटीवार अशी प्रतिमा असलेले पालकमंत्री चंद्रपूर जिल्ह्याला लाभले आहेत हा जिल्ह्याचा गौरव आहे. 30 जुलैला मुनगंटीवार यांच्या जन्मदिनानिमित्त मुनगंटीवार यांचा जन्मदिनानिमित्त कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचे फ्लॅग बॅनर लावू नये आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर अशा सेवाभावी कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा असेही आव्हान यावेळेस करण्यात आले सेवा सहयोग आणि सहकार्य या त्रिसूत्रीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहनही यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी केले 30 जुलै रोजी गिरणार चौक येथे रक्तदान शिबिर व पूर्ण येथे महा आरोग्य शिबिर गोकुळ येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून विविध शासकीय योजनांच्या मदतीकरिता निशुल्क सेवा दिन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची भाजप नेत्यांनी यावेळी कळविले.

चर्चा नागपूरच्या कोर कमिटीच्या मीटिंगची !
लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीनिमित्त नागपूर येथे चंद्रशेखर बावनकुळे व संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांच्या उपस्थितीत जिल्हा निहाय भाजप कोर कमिटीची बैठक शुक्रवार दि. २६ रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चंद्रपूर येथून पालकमंत्री मुनगंटीवार यांच्यासह आमदार भांगडिया जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र राहुल पावडे देवराव भोंगळे अतुल देशकर चंदन सिंह चंदेल डॉक्टर मंगेश गुलवाडे आणि अन्य महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दारुण पराभव चर्चा करण्यात आल्याची कळते तसेच या बैठकीत जिल्हा भाजप कार्यकर्त्यांच्या उदासीनतेबाबत चर्चा होऊन त्यात पक्षविरोधकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची सुतोवाच करण्यात आले. 

पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनापासून कार्य केले नसल्यामुळे मोठ्या मताधिक्याने भाजप उमेदवाराचा पराभव झाला. पदाधिकारी कार्यकर्ते हे मतदारांपर्यंत पोहोचलीच नाही अशी या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पदाधिकाऱ्यांनी ३० जुलै ते १५ अॉगस्टपर्यंत  सेवा पंधरवडा निमित्त मतदारांच्या दारापर्यंत जाऊन त्यांना शासकीय योजनांच्या व मदतकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले असल्याचे ही सांगण्यात येत आहे.