बोगस झाडे जात प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाईगडचिरोली - जिल्ह्यातील झाडे कुणबी हे धनगर पोटजाती तील झाडे या नाम सदृश जातीचा फायदा घेत बोगस जात प्रमाणपत्रे घेत नोकरी बळकावली आहेत.याबाबत धनगर संघटनांनी आक्षेप घेत आंदोलने केली. याबाबत प्रशासनाने दखल घेत अनेक प्रकरणे जात पडताळणीत अवैद्य ठरवलेली आहेत.सन २०२२ मध्ये पोलीस विभागात शिपाई पदावर निवड झालेल्या श्रीकृष्ण डुबलवार याचे गडचिरोली जात पडताळणी समितीने जातवैद्यता प्रमाणपत्र अवैद्य ठरविल्याने पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी निलंबित केले आहे.


गडचिरोली जिल्ह्यात झाडे कुणबी या जातीचे लोक धनगर झाडे या नामसदृश्याचा गैरफायदा घेत भटक्या जमाती क मध्ये घुसखोरी करून नोकरी बळकावीत आहेत. याबाबत धनगर संघटनांनी आंदोलने करीत प्रशासनाला जागे करण्याचे काम केले. यांची प्रशासनाने गंभीर दखल घेत अनेक प्रकरणे जात पडताळणीत अवैद्य ठरवलेली आहेत. त्यातील श्रीकृष्ण डुबलवार यास मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) १९५६ मधील नि.क्र.३ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम- १९५१ मधील नि. क्र.२५ नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन निलंबित केले आहे.


राज्य राखीव पोलीस काटोल भरतीतील साहिल तूंकलवार, गणेश बर्लावार व गडचिरोली पोलीस भरतीतील समृध्दी पुरकलवार यांचेही जात वैद्यता प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याचे खात्रीलायक माहिती आहे. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतल्यामुळे धनगर समाजात घुसखोरी करणाऱ्या बोगस झाडे यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे.यामुळे धनगर झाडे जातीत घुसखोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनामध्ये खळबळ माजली आहे.