वाघाच्या हल्लात मेंढपाळ जखमीपोभुर्णा तालुक्यातील घनोटी येथे मेंढपाळांचा कळप बसलेला असताना रात्री साडेबारा वाजता च्या दरम्यान झोपेत असलेल्या मेंढपाळावर जबाब धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवला, आरडाओरडा केल्यामुळे बाजूलाच असलेले सोबती धावून गेल्याने वाघाच्या हल्ल्यातून मेंढपाळ थोडक्यात बचावले,


प्राप्त माहितीनुसार काल दि 11 मे रोजी मारोती सोमेश्वर बालुगवार रा.भंगाराम तळोधी ता.गोंडपिपरी येथील मेंढपाळ आपल्या मुलबाळासोबत मेंढ्या घेऊन घनोटी येथे शेतशिवारात होते, मध्यरात्री१२.३० वाजताच्या सुमारास गाढ़ झोपेत असताना वाघाने त्याच्यावर हल्ला केला,मारोती ने हल्ला होताच आरडाओरडा केल्यामुळे त्याला सोडून वाघाने पळ काढला,मारोती बालूगवार यांच्या गळ्यावर ,मानेवर गंभिर दुखापत झाली आहे. सदर घटनेची माहीती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.सध्या बालुगवार यांचेवर पोभुर्णा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.