महानायकाने केलं फडणवीसांच्या कामाचं कौतुक!




मुंबई:- “वाह, क्या बात है, साफ सुथरी नयी बढीया सडक, कोई रूकावट नही” अशा शब्दात महानायक अमिताभ बच्चन यांनी फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडचे कौतुक केले.

आपल्या कामानिमित्त मरीन ड्राईव्हला जात असताना त्याणी सिलिंक ते कोस्टल रोड ते अंडरग्राऊंड टनेल असा प्रवास केला तो अवघ्या तीस मिनिटात. या विषयीचे ट्विट करत त्यांनी कोस्टल रोडचे कौतुक केले. ‘तर परंपरा, प्रतिष्ठा, अनुशाषन हे या सरकारचे तीन स्तंभ आहेत’ अशी डायलॅागवजा प्रतिक्रीया आपल्या रिट्विट मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘मुंबई बदलतेय,आम्ही मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ कसा कमी करता येईल यावर काम करत आहोत” असेही फडणवीसांनी सांगितले.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून कोस्टल रोडकडे पाहिलं जात होतं. आधी त्यांनी अटल सेतूचं काम मागच्या मुख्यमंत्रीपदाच्या टर्ममध्ये हाती घेतलं होतं. ते यशस्वी केलं. त्यांचा दुसरा ड्रीम प्रोजेक्ट निकाली काढण्यासाठीच्या हलचाली त्यांनी सुरु केल्या होत्या. एकीकडे फडणवीस निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. 


दुसऱ्या बाजूला कोस्टल रोडचे काम प्रगती पथावर आहे.काही दिवसांपूर्वीच मुंबईकरांसाठी वरदान ठरणारा कोस्टल रोडचं काम पुर्ण झालं आहे.
या क्रमात कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंक यशस्वी रित्या जोडण्यात आला आहे.  बो आर्क स्ट्रिंग गर्डरद्वारे ही मोहिम फत्ते करण्यात आली होती. त्यामुळे कोस्टल रोडवरची वाहतूक थेट सी लिंकवर नेता आली. मुंबईकरांची ट्राफिकपासून सुटका करण्यासाठीचं हे महत्त्वाचं पाऊल होतं. गर्डर जोडण्यासाठी समुद्रातील उंच आणि कमी भरतीचा वापर करण्यात आला. अत्यंत नियोजनपुर्ण पद्धतीने हे काम करणारण्यात आलं. गर्डरद्वारे हे दोन्ही मार्ग जोडण्याचा भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग झाला आहे.

कोस्टल रोड प्रकल्पाचा प्रस्ताव पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१३ साली मांडला होता. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली ती २०१७-१८ साली. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री पद होतं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. शिवसेना युतीमध्ये त्यांच्यासोबत होती. पुढं मात्र चित्र पालटलं.


 २०१९ ला राज्यात मोठा सत्ता प्रयोग झाला. महाविकास आघाडीचं सरकार बनलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली, परंतु कोरोनाचा तडाखा बसला. कोरोनातून सावरल्यानंतरही प्रकल्पाला म्हणावं त्या वेगानं पुढं ढकलं गेलं नसल्याचा आरोप झाला. यादरम्यान विरोधी बाकावर बसलेल्या भाजपने जोरदार टीका केली होती. अडीच वर्षांनंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेतून खाली खेचण्यात आलं. महायुती सत्तेत आली. आता त्यांच्या काळात हा प्रकल्प पुर्णत्त्वास गेला.