फडणवीसांच्या त्या पत्रात दडलं तरी काय;मोदींच्या कानात काय बोलणे झाले?

 चंद्रपूर आर्णी वणी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातून प्रचार सभेचा विजयाचा संकल्प केला.‌ पंतप्रधान मोदी साडेपाच वाजता मंचावर दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्व मान्यवरांसोबत अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काकू माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांना जवळ बोलावून पंतप्रधान मोदी यांच्यासोबत भेट घडवून दिली. 


यावेळी शोभाताई फडणवीस यांनी मोदींच्या कानात काहीतरी सांगितले. त्यानंतर काही क्षणातच त्या पुन्हा मागे गेल्या आणि एक हातात पांढरा लिफाफा घेऊन पुढे आल्यात आणि तो लिफाफा पंतप्रधान मोदी यांच्या हातात दिला. आता हा नेमका लिफाफा काय होता. त्यात नेमके काय लिहले. त्यात नेमकं काय मागणी होती  या संदर्भात ज्यांनी ज्यांनी बघितले त्यांच्या मनात चर्चा निर्माण झाली आहे. हा बंद लिफाफा देण्यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही छुपी खेळी होऊ शकते का किंवा माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांना वेगळ्या काही मागणीसाठी हा पत्र असू शकतो का, अशी चर्चा देखील आता रंगली आहे. 


पंतप्रधानांना शोभाताई फडणविस यांनी दिलेल्या पत्राचे गुपीत काय  असा प्रश्न ज्यांनी ज्यांनी स्क्रीनवर बघितला त्यांना पडला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर कुणाला काही ध्यानी मनी नसताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शोभाताई फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र दिले. त्या पत्रात काय गुपीत आहे, याची चर्चा सभेत होती. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू या सावली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार राहिल्या आहेत. त्यांनी राज्याचे मंत्रीपद देखील भोगले आहे. त्यांच्या काळामध्ये डाळ घोटाळा झाला होता. तेव्हा त्यानंतर त्या खूप बदनाम झाल्या आणि त्यांना नंतरच्या काळामध्ये कोणतीही संधी मिळाली नाही. मध्यंतरी त्या विधान परिषदेच्या सदस्य झाल्या होत्या.  मतदार संघाची फेररचना झाल्यानंतर त्यांचा मतदारसंघ हा ब्रह्मपुरी आणि बल्लारपूर मध्ये विभाजित झाला. 


बल्लारपूर मध्ये विभाजित झाल्यानंतर त्या मतदारसंघावर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ताबा मिळवला आहे. तेव्हापासून शोभाताई फडणवीस या नाराज आहेत. राजकीय जाणकार आणि जवळचे कार्यकर्ते असे सांगतात की आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये शोभाताई फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवार यांना कधीच मदत केली नाही. उलट पक्षी त्या काँग्रेसच्या उमेदवारांसोबत राहिल्या. असे अनेक जुने कार्यकर्ते आजही उघडपणे बोलू लागले आहेत.