दारुचे नाव घेताच शरद पवार गटाचे जैस्वाल भडकले!




लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. विविध चॅनल, माध्यमातून निवडणूकीच्या चर्चाही रंगत आहे. अशातच चंद्रपूर लोकसभा निवडणूकीचा आढावा घेणार्या एका मुंबईच्या माध्यम चॅनलच्या प्रतिनिधीच्या प्रश्नावरील उत्तरात राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते, जिल्हा लिकर असोसिएशनचे अध्यक्ष दिपक जैस्वाल जाम भडकले आणि राडा झाला. 

या घटनेचा व्हिडीओची यु—ट्यूब लिंक सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिपक जैस्वाल हे दारू हा शब्द ऐकताच जाम भडकल्याचे दिसत आहे, दारू हा त्यांचा व्यवसाय, ते प्रचार करीत असलेल्या उमेदवारांचाही प्रमुख व्यवसाय दारूच असतांना, 'दारू बोले तो गुस्सा क्यू आता है जी...!' अशी प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे. हा व्हिडीओ चॅनलनी त्यांच्या यु—टयूब अकाउंटवर पोस्ट केला आहे.


135 करोडची अधिकृत संपत्ती दाखविल्यांने आणि सोशल मिडीयावरील तब्बल 36 दारूचे दुकाने असल्यांचे पोस्ट (हा आकडा खरा कि खोटा यावर दुमत आहे) फिरत असल्यांने, कॉंग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी चर्चेत आली आहे. प्रतिभा धानोरकर यांनी निवडणूक अधिकार्यासमोर दिलेल्या शपथपत्रात, आपला व्यवसाय शेती आणि व्यवसाय असे दिले आहे. यातील व्यवसाय म्हणजे दारूचे दुकानेच असल्यांचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. अशावेळी दारू शब्दांची त्यांना आता अॅलर्जी का? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.


चॅनलचे पत्रकारांनी दीपक जैस्वाल यांना लोकसभेच्या अनुषंगाने प्रश्न विचारताच, त्यांनी 'मी सांगीतलं, शेतकर्याचा विषय घेतो मी' असे म्हणताच, एकानी दारूचे लायसन्सवर प्रश्न केला. यावर दीपक जैस्वाल यांनी, दारूचा विषय सोडा, इथे सर्वच दारू पितात, मीच दारू पीत नाही असे म्हणताच, तीथे उपस्थित महिलांनी यावर आक्षेप घेत आम्ही दारू पीत नाही, येथील सर्वच दारू पीतात असे कसे म्हणालात म्हणत जाब विचारला. शब्दात चुक लक्षात आल्यावर दीपक जैस्वाल यांनी शब्द फिरवीत अधिकतर लोक दारू पीते म्हणत वेळ मारून नेण्यांचा प्रयत्न केला. 

मात्र तोपर्यंत भाजपाचे लोक चांगलेच आक्रमक झाले आणि भाजप—कॉंग्रेस भाजपात राडा झाला. 'वो कायको बोलता दारूके बारे में... दारूका विषय निकलेगा तो याद रखना तू.. याद रखना बोला .... अशी थेट धमकीच बोलणार्याच्या दिशेने अंगलीनिर्देश करीत दीपक जैस्वाल यांनी दिल्यांचे व्हिडीओत दिसत आहे. बीजेपी दारूच नाही तर लोकांचा रक्त पीते असे प्रत्युत्तर कॉंग्रेसकडून देण्यात येत होते. यानंतर घटनास्थळी प्रचंड राडा झाला. चंद्रपूर महानगरचे अध्यक्ष राहूल पावडे हे मध्यस्थी करतांना व्हिडीओत दिसत आहेत.
दारूच्या व्यावसायीकांला 'दारू बोले तो गुस्सा क्यू आता है जी....! अशी प्रतिक्रिया घटनास्थळावर चर्चा केली जात होती.