मोदींनी थोपटली पाठ; मतदारांच्या वाढत्या प्रतिसादामुळे जानकरांचे पारडे जड

 परभणी येथे जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर Mahadev jankar यांचे प्रेमाने 'माझा लहान भाऊ' असा उल्लेख करून त्यांचे कौतुक केले. परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना जनसामान्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा निवडणूक होत आहे. या क्षेत्रात दोन दिग्गाजाची तुल्यबळ लढत होणार अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र महायुतीचे भाजप शिवसेना राष्ट्रवादी रिपाई, राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जगन्नाथ जानकर यांचे प्रत्येक गावात, तांडा वस्ती वाड्यावर होत असलेल्या जंगी स्वागत समारंभ  हे विजयी होण्याचे चिन्ह दिसत आहे.


मतदार स्वत:हून महादेव जानकर यांना रस्ता रस्त्यावर उभे राहून जबरदस्तीने गावात मिरवणूक काढून १००% टक्के मतदान करण्यासाठी अभिवचन देत आहेत. त्यामुळे जानकरांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परभणीत सभा झाली  त्या सभेत नरेंद्र मोदी यांनी येत्या २६ तारखेला परभणी लोकसभा मतदारसंघातून "माझा लहान भाऊ महादेव जानकर" यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत परभणीकरांनी जानकरांना डोक्यावर घेतले आहे.परभणी लोकसभा क्षेत्रात पहील्यांदाच पंतप्रधान आल्याने अलोट गर्दी या सभेचे आकर्षण ठरले आहेजानकर यांच्या प्रचाराची धुरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे माजी ,मंत्री बबनराव लोणीकर, आमदार मेघनाताई बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र विटेकर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उचलल्याने मोठी शक्ती पाठीशी उभी झाली आहे.