धनगर समाजाची लोकसभा निवडणुक संदर्भात बैठक

 चंद्रपूर लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून अनेक पक्ष अनेक जाती आप आपल्या जातीचा अनेक पक्षासोबत एकनिष्ठ असल्याचे दाखवीत आहे.धनगर समाजाची चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात धनगर समाजाची निर्णायक मते आहेत.त्या मतांवर अनेक पक्षांच्या उमेदवारांचा डोळा आहे. त्यामुळे धनगर समाजांनी कोणत्या उमेदवारांना पाठिंबा द्यावे याबाबत न्यु इंग्लिश हायस्कूल मध्ये विवीध  संघटनाच्या उपस्थीतीत बैठक आयोजित करण्यात आली होती.धनगर समाजाला लोकसभेत लोकसंख्येनुसार कमीत १० उमेदवार द्यायला पाहिजे होते. मात्र कोणत्याही पक्षाने धनगर समाजाला उमेदवारी दिली.मात्र महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांना उमेदवारी दिली.त्यामुळे धनगर समाज संपुर्ण पणे महायुतीचे चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना पाठिंबा देत असल्याचे एकमताने ठराव पास करण्यात आले.


यात महायुतीच्या उमेदवारांनी सर्वप्रथम प्राधान्य धनगर समाजात होत असलेला अन्याय दुर करावा,त्यात धनगर समाजात गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेला  झाडे कुणबी समाजाची घुसखोरी थांबविण्यात यावे,मेंढपाळाना मेंढी चराई पासेस उपलब्ध करून देण्यात यावे,धनगर आरक्षण न्यायालयीन लढ्याला समाजाला पाठिंबा द्यावे, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवारी देण्यात यावी असे अनेक विषयांवर चर्चा करून पाठींबा देण्यात आला.


या बैठकीला चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यात डॉ मंगेश गुलवाडे, साईनाथ बुच्चे, पांडुरंग पंडीले,संजय कन्नावार, डॉ तुषार मर्लावार,वामन तुर्के,संदीप शेरकी,गजानन शेळके, वासुदेव आस्कर,सौ.ज्योतीताई दरेकर,प्रतीभाताई काळे, डॉ.साईनाथ येवले, हेमंत ढोले,प्रदीप ढाले, सुधाकर घोरपडे, डॉ यशवंतराव कन्नमवार, रमेश उरकुडे, सुनील पोराटे, परशुराम उगे,गणपतराव येवले,मंदे,खेमदेव कन्नमवार,मयुर भोकरे, पवन ढवळे, प्रविण गिलबिले व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते