नागभिडच्या लक्की किराणा वर पोलीसांची कृपा दृष्टी Nagbhid's Lakki Kirana is graced by the police



नवनियुक्त पोलीस अधीक्षक यांच्या बेधडक कारवाई नंतर अनेक अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे. अनेक अवैध व्यवसायिकांसोबत मधूरसंबंध असलेल्या नागभिडच्या हनीफ ( लक्की किराणा ) ने एका आमदाराच्या माध्यमातून सुगंधित तंबाखू व भेसळयुक्त तेलाची विक्री सुरू ठेवली आहे.



या लक्कीनी भेसळ तेलच नव्हे तर त्यानी परराज्यातील सुगंधित तंबाखू तस्करासोबत हातमिळवणी केली आहे.परराज्यातील सुगंधित तंबाखू तस्करांसोबत मोठी भागीदारी आहे. संबधीत अन्न व औषध विभाग, पोलीस स्टेशन हे त्यांच्या डाव्या हाताचे खेळ असल्याचे तो नेहमी पत्रकार ,जनप्रतिनिधीना सांगत असतो.



तंबाखूसारख्या विषारी वस्तू विकून सर्वसामान्य जनतेशी खेळ खेळत आहे.हनिफ विकत असलेल्या विषारी वस्तुमळे अनेकांना अनेक रोगाने ग्रासले आहे. सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांमुळे अनेक तरुण पिढीच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. एका सर्वेक्षणानुसार तोंडाचे 90% कॅन्सर हे तंबाखूच्या सेवनामुळे होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.यासाठी सरकार हजारो कोटी रुपये खर्च करते. दरवर्षी जाहिरातीद्वारे कॅन्सर जनजागृती केली जाते,मात्र हनिफ सारखे अवैध व्यावसायिक या व्यवसायाला चालना देत आहेत.



नवनियुक्त पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आपल्या पदाचे सुत्रे हाती घेताच सुगंधित तंबाखूजन्य विक्रेत्यांवर कारवाई करण्याची सर्व पोलीस स्टेशन ला आदेश दिले आहेत.मात्र नागभिडच्या पोलीसांनी सुगंधित तंबाखू व्यवसायीक हनीफ यांच्या वर कोणतीही कारवाई न करता जणू कृपा दृष्टी आहे.त्यामुळे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नागभिड तालुक्यातील या मोठ्या व्यवसायीकावर कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.