चवरे बिल्डिंग मधील ऐ टू झेड सेलला भिषण आग A massive fire broke out at the A to Z cell in Chawre Building




चंद्रपूर शहराच्या तुकूम परीसरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या ऐ टू झेड सेलला सकाळी ८ वाजे दरम्यान भिषण आग लागली या आगीत सेलमधील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांची नुकसान झाले आहे. महानगरपालिकेची मंजूरी नसतांना संजय चवरे यांनी इलेक्ट्रीक कनेक्शन साठी मंजूर नसलेल्या ठिकाणी डिपी लावल्याचा आरोप केंद्रीय मानवाधिकार संगठन नव्वी दिली चे महाराष्ट्र प्रदेश संघटन सहसचिव निलेश हिवराळे यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केले होते. 

   
https://www.chandrapurkranti.in/2023/08/chavareni-installed-electric-dp-at.html


दि.२४ ऑगस्ट २०२३ रोजी  "मंजूर नसलेल्या ठिकाणी चवरेनी लावली इलेक्ट्रीक डिपी" अश्या आशयाची बातमी चंद्रपूर क्रांती मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. वेळीच सदर बातमीची दखल घेतली असती तर हा अनर्थ टाळता आला असता.विज वितरण विभागाचे अधिकारी बंडीवार व कर्मचारी यांनी सदर डिपी लावण्यासाठी अर्थपूर्ण व्यवहार केल्याचे आता उघडकीस आली आहे.त्यांचे अनेक कारनामे तुकूम परीसरातील नागरीकासाठी नवीन नाही.

 

संजय गोविंदराव चवरे, सव्र्व्हे नं. १०६/१, प्लॉट नं. २१२ मौजा दे. गो. रेय्यतवारी चंद्रपूर राहणार ताडोबा रोड तुकूम चंद्रपूर यांनी आपल्या जागेवर मागील ३वर्षापासून A to Z सेल, रेस्टॉरेन्ट हॉटेल, पॉपीन्स बिर शॉपी सुरू केले आहे. डिपी लावण्यासाठी महानगरपालिकेची कोणतेही परवानगी घेण्यात आले नाही  डी. पी.लावलेल्या ठिकाणापासुन ३-४ फुटांवर रहिवाश्यांचे वास्तव्य आहे. त्या डी. पी. ला आग सकाळी लागल्याने मोठी जिवीतहानी टळली अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.