मुंबई : महाराष्ट्रातील १८जातींना अन्य मागासवर्गीयांच्या केंद्रीय सूची (यादी) मध्ये समाविष्ट करण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक बाबींविषयींचा सर्वंकष अहवाल येत्या ७ दिवसांत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या कार्यालयास नव्याने सादर करा, असे निर्देश राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील विविध १८ मागास जातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, असा प्रस्ताव केंद्रीय राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवला आहे. या प्रस्तावावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी मुंबईत शनिवारी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेऊन या प्रस्तावाचा आढावा घेतला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, ओबीसी विभाग सचिव विनिता वेद सिंगल उपस्थित होत्या.
याप्रसंगी अहिर यांनी आयोगाच्या दिशानिर्देशानुसार संबंधित जातींचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक बाबींविषयींचा अहवाल देण्यास राज्य शासनाकडून विलंब होत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच यासंदर्भातील परिपूर्ण अहवाल येत्या ७ दिवसांत आयोगाला सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व ओबीसी विभागाच्या सचिवांना दिले.
१८ जातींचा ओबीसीत समावेशाचा प्रस्ताव
१) लोधा - लोधी लोधा, २) बडगुजर, ३) वीरशैव लिंगायत, ४) सलमानी, ५) किराड, ६) भोयर पवार, ७) सूर्यवंशी गुजर, ८) बेलदार, ९) झाडे, १०) डांगरी, ११) कुलवंत वाणी, १२) कराडी, १३) नेवे वाणी, १४) कापेवार, मुन्नर कापेवार, मुन्नर कापू, तेलंगा, तेलंगी, पेंटारेड्डी, बुकेकरी, १५) कनोडी, कनाडी, १६) सेंगर, १७) लेवे गुजर, रेवा गुजर, रेवे गुजर १८) भनारा, भनारे, निशाद, मल्ला, मल्हा, नावीक, ओडा, ओडेवार, ओदेलु, बेस्तार, बेस्ता, बेस्ती, बेस्तालु, भनार
झाडे यांची धनगर जातीतून खोटे प्रमाणपत्रे काढण्याचा प्रयत्न
धनगर समाज एन टी सी च्या आरक्षण घेत आहे. त्यात अनेक पोटजातीचा समावेश आहे.त्यात झाडे धनगर या पोटजातीचा समावेश असून त्याचा फायदा घेत झाडे कुणबी समाजांनी धनगर समाजात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.महसुली पुरवाव्यात खोडतोड करून फक्त झाडे ठेवले आहे.महसुली पुराव्यांची सत्यता तपासून पाहिले तर सर्व बोगसपणा बाहेर येईल.