ब्रेकिंग :- लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांना महायुतीने आतापर्यंत समाविष्ट करून घेतले नव्हते त्यामुळे महादेव जानकर महायुती सोबत फारकत घेत वेगळी चुल मांडण्याचा प्रयत्न केला. महादेव जानकरांची मनधरणी करीत फडणवीसांच्या मध्यस्थीने महायुतीत राष्ट्रीय समाज पक्षाचे समावेश करीत लोकसभेची एक जागा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जानकरांनी लोकसभेसाठी राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीने तिन जागा द्यावा अशी मागणी केली होती.मात्र महायुतीने कोणत्याही बैठकिला न बोलावता महायुती जाहीर केली. जानकरांनी तटस्थ भुमिका ठेवत माढा परभणी लोकसभा मतदारसंघात विजयी मेळावे घेतले. त्यामुळे इंडीया आघाडीचे शरद पवार यांनी आपल्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाला माढाची जागा जानकर यांना देण्याची घोषणा केली होती. मात्र यासाठी इंडिया आघाडी मध्ये एकमत नसल्याने जानकर वेगळ्या भुमीकेत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकरांसोबत दिलजमाई केल्याने शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.उपमुख्यमंत्री यांच्या पुढाकारातून जानकर यांना महायुतीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जानकर आता महाविकास आघाडी नव्हे महायुतीत राहणार आहेत.राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीत गेल्याने परभणी ,माढा,सांगली, बारामती लोकसभेत वेगळे चित्र दिसणार आहे.