चंद्रपूर, दिनांक ०९/०३/२०२४:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार, दिनांक ११ मार्च २०२४ रोजी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात विविध प्रकल्पांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र, या दौऱ्यावर पत्रकारांना वृत्त संकलन करण्यासाठी कोणतेही पासेस देण्यात आले नाहीत. त्याऐवजी, पत्रकारांना भोजन पासेस देण्यात आले. या निर्णयामुळे पत्रकारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील विसापूर येथील श्रद्धेय श्री अटलबिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डन (२३८.२९ कोटी रुपये), श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महीला विद्यापीठ मुंबई महर्षी कर्वे महीला सक्षमीकरण ज्ञानसंकूल विसापूर (५०० कोटी रुपये), अमृत २.० अंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिका पाणीपुरवठा प्रकल्प (२७०.१३ कोटी रुपये) आणि अमृत २.० अंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिका मलनिस्सारण प्रकल्प (५४२.०५ कोटी रुपये) यांचा समावेश आहे.
मात्र, या दौऱ्यावर पत्रकारांना वृत्त संकलन करण्यासाठी कोणतेही पासेस देण्यात आले नाहीत.या निर्णयामुळे पत्रकारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पत्रकारांनी आरोप केला आहे की, प्रशासन त्यांना माहितीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.