माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या उपस्थितीत जुनासुर्लात २१ फेब्रुवारीला विविध कार्यक्रम Various programs on February 21 in Junasurlat in the presence of former minister MLA Mahadev Jankar
मुल तालुक्यातील जुनासुर्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर व ओबीसी एस सी एसटी व्हिजेएनटी समाज प्रबोधन मेळावा व जेष्ठ नागरीकांचा सत्कार कार्यक्रम दि.२१ फेब्रुवारी २०२४ रोज बुधवारला सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले आहे .या आरोग्य तपासणी शिबीरात रक्त तपासणी, डोळे तपासणी, हृदय तपासणी,कॅन्सर तपासणी व इतर जनरल तपासणी करण्यात येणार आहे तसेच ओबीसी एस सी एसटी व्हिजेएनटी समाज प्रबोधन मेळावा घेण्यात येणार आहे

या आरोग्य तपासणी शिबिर प्रबोधन मेळाव्याला राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री आमदार महादेव जानकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.या मेळाव्याला रासप प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर, विदर्भ अध्यक्ष प्रा रमेश पिसे, मुख्य महासचिव संजय कन्नावार, विदर्भ उपाध्यक्ष डॉ तौसीफ शेख, 


महासचिव वाहतूक आघाडी अनूप यादव,अमृत वनमाळी जिल्हाध्यक्ष गडचिरोली,रमाकांत यादव जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, वंदना गेडाम जिल्हाध्यक्षा महीला आघाडी चंद्रपूर किरण होले जिल्हाध्यक्ष अमरावती,सुरज ठाकूर जिल्हाध्यक्ष यवतमाळ, गणेश मानकर जिल्हाध्यक्ष अकोला, प्रभाकर डोईफोडे जिल्हाध्यक्ष बुलडाणा, नितेश मरठे, चंदन येवले, आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. 


या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अशोक कोल्हे, मुन्ना मॅकलवार, सुरेश कन्नमवार,दिपक भंडारवार,साईनाथ येवले,दिपक वर्मा, देवव्रत सिंग ठाकूर, विनोद सोनार,सुखराम प्रजापती,मनजीत यादव मायादीन रवीदास,अमर वर्मा, संदीप सिडाम ,राहुल यादव, त्रिभुवन वर्मा यांनी केले आहे.