बरांज कोळसा खाण प्रकल्पग्रस्त महील्याचे अन्नत्याग



गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या कर्नाटक एम्टा कोळसा खाणीतील महीला गेल्या ६० तासांपूर्वी जलसमाधी आंदोलन सुरू केले होते.६० तासांचा अवधी लोटल्यानंतरही प्रशासनाने कोणतीही पावले उचलण्यात आली नसल्याने महील्यांनी आज सकाळपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.


कर्नाटक एम्टा कोळसा खाण प्रशासनाने प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांनी पुनर्वसन करणे,जमीनीचा मोबदला देण्यात यावे यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून आमरण आंदोलन सुरू केले आहे.प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकल्पग्रस्त महील्यांनी ८ फेब्रुवारीला रात्री ३.०० पासून २०० फुट खोल खड्ड्यात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले होते.



या जलसमाधी आंदोलनाला साठ तासांचा अवधी लोटल्यानंतरही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत महीला आंदोलकांची थट्टा केली असल्याचे प्रकल्पग्रस्त महील्याचे म्हणणे आहे.



१० फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसासह गारगोटी पडल्याने भद्रावतीकरांना चांगलेच झोडपले होते.या आंदोलक महिलांनाही या वादळी वाऱ्यासह गारगोटीचा सामना करावा लागला.तरीसुध्दा कर्नाटक एम्टा कंपणीच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलक महिलांकडे पाठ फिरवली असल्याने आंदोलक महीला संतापले.आज ११ फेब्रुवारीच्या सकाळपासून आंदोलक महील्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.


१० आंदोलन कर्ते सर्व महीला असतांनासुध्दा आंदोलक महिलांच्या सुरक्षेसाठी कोणतेही महीला पोलीस यावेळी आढळून आले नाही.फक्त दोन पुरुष पोलीस कर्मचारी यावेळी आंदोलक महिलांसोबत उपस्थित होते.त्यामुळे १० आंदोलक महिलांचा डोलारा २ पोलीस कर्मचारी सांभाळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे