चंद्रपूर (वि.प्र.)
चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मध्ये ८ & ९ मध्ये क्लीनींग ची कामे सुरू आहेत. ती कामे कंत्राटदार रमेश देशमुख यांच्याकडे आहे त्यांच्या कंपणीत काम करणारे कंत्राटी कामगार ओएस ३ चे क्लिनींगच्या कामात व्यस्त आहे. ओएस ३ चे कार्यकारी अभियंता इटकलकर हे आहेत. आपला पदाचा गैरवापर करत त्यांनी क्लीगींनच्या कामातील तिन कंत्राटी कामगारांना आपल्या निवासी क्वार्टर नंबर सी-३ मध्ये घरगुती कार्यक्रमासाठी साफसफाई करीता वापर केला.
याबाबत त्यांना विचारले असता क्वार्टर ची साफसफाई करणे गरजेचे होते. त्यामुळे कंत्राटी कामगारांना साफसफाई करण्यासाठी त्यांना सकाळपासून बोलावण्यात आले आहे. "कंत्राटदाराला यांचा त्रास नाही. तुम्हालाच त्रास होत आहे का?" खोचक सवाल पत्रकारांना केला. "उलटा चोर कोतवाल को डाटे" अशी भुमिका कार्य. अभियंता इटलकर यांची आहे.
विजनिमीर्ती क्षेत्रात सध्या साफसफाई करणे सुरू आहे. त्यामुळे कामगारांना त्या व्यतिरीक्त कंत्राटी कामगारांना बाहेर कामास पाठवता येत नाही.८ & ९ मधील कामे कंत्राटदारांकडून करून घेण्याचे काम कार्यकारी अभियंता इटकलकर यांचेकडे आहे. त्याचाच गैरफायदा घेत कंत्राटी कामगारांना खाजगी कामासाठी वापर करीत आहे. स्वतः: च्या खाजगी कामासाठी सीटीपीएस चे कंत्राटी कामगारांचा वापर कितपत योग्य आहे, याचा तपास करून इटलकर यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
अशा अनेक गैरप्रकारात कार्यकारी अभियंता इटकलकर अडकले असून लवकरच ते प्रकरण चव्हाट्यावर येणार व इटलकर यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलल्या जाते.