राष्ट्रीय समाज पक्षाचे ध्येय धोरणे पक्षाचे विस्तारीकरण करण्यासाठी राज्यात संपूर्ण जिल्ह्याची कार्यकारीणी घोषीत करण्यात आले आहे.राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री आमदार महादेव जानकर साहेब यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष काशीनाथ (नाना) शेवते मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर, विदर्भ अध्यक्ष प्रा रमेश पिसे, विदर्भ महासचिव संजय कन्नावार, विदर्भ उपाध्यक्ष डॉ तौसीफ शेख यांच्या नेतृत्वात विदर्भातील जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात नव्याने जिल्हाध्यक्षसह कार्यकारीणी घोषित करण्यात येणार आहे.येणारी लोकसभा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार आहे.त्या दृष्टीकोनातून गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदावर श्री अमृत वनमाळी यांची निवड विदर्भ महासचिव संजय कन्नावार यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्हा हा राजकीय दृष्ट्या राष्ट्रीय समाज पक्षासाठी अनुकूल वातावरण असून येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी रापस तयार आहे.मागील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे विजयी उमेदवारांमुळे चांगल्या चांगल्या राजकिय विश्लेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या.मागील निकाल बघता राष्ट्रीय समाज पक्ष यावेळी चांगलीच मुसंडी मारणार असल्याचे विदर्भ महासचिव संजय कन्नावार यांनी सांगितले आहे