चंद्रपूर शहरात भरदिवसा अस्वलाचा धुमाकूळ


चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भिवापूर वार्डातील सुपर मार्केट जवळ अस्वलाच्या धुमाकाळामुळे नागरीकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.भिवापूर वार्डातील एका दुकानात नागरीक बचावासाठी गेले असता अस्वलीने त्या दुकानात शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्याचा सीसीटीव्ही कॅमेरे व्दारे दिसून येत आहे.यापुर्वी चांदा पोर्ट रेल्वे स्टेशन जवळ एका इसमाला जखमी केले होते.जखमी इसमाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे माहीती आहे.एक ते दिड किलोमीटर अंतरावर जंगल लागून आहे.त्या जंगलातील एक अस्वल भिवापूर वार्ड,लालपेठ काॅलरीमध्ये दिवसाढवळ्या फिरत आहे.त्यामुळे परीसरातील नागरीकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.याबाबत परीसरातील भयभीत नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीव्दारे कळविण्यात आले.मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यानी माझ्याकडे हे क्षेत्र येत नसल्याचे सांगून हात झटकले.त्या दुकानदारांच्या समयसुचकतेने दुकानाचे दरवाजे( शटर) त्वरीत बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली.त्या अस्वलाला त्वरीत जेरबंद करण्यात यावे अशी मागणी परीसरातील नागरिकांकडून केले जात आहे.