जुनासुर्लात निघाली भव्य श्रीराम शोभायात्रा




मुल तालुक्यातील जुनासुर्ला येथे श्री प्रभू रामचंद्र जन्मभूमी अयोध्या नगरीत आज मोठ्या थाटात श्री रामाची प्राणप्रतिष्ठा सोहळा फार पडली त्याच निमित्ताने जुनासुर्ला येथील भाजपा मार्फत भव्य शोभायात्रा गावातून काढण्यात आली.यात श्री प्रभु रामचंद्र,लक्ष्मण, सीतामाई ,हनुमान यांची वेशभूषा धारण करून गावात शोभायात्रा काढण्यात आली.




या प्राणप्रतिष्ठा सोहळा दरम्यान गावात साफसफाई रंगरंगोटी, मंदिरात दिव्यांची आरास करून संपूर्ण गाव भक्तीमय सागरात उजळून गेले होते.यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीने जुनासुर्ला वासीय दुमदुमून गेले होते.जय श्रीराम जय श्रीराम च्या घोषणा गाव राम भक्तीत तल्लीन होऊन युवक डिजेच्या तालावर रामधूनावर थिरकत होते.सामाजिक कार्यकर्ते गंगा इदुलवार यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. जुनासुर्ला गावातील हनुमान मंदिरातून ही शोभायात्रा काढण्यात आली होती.