राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 प्रतिभावान तरुणांना उपलब्ध करून देणार योग्य व्यासपीठ.. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री मा. अनुराग ठाकुर जी यांच्यासह आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नाशिक येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 च्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्र पूर्णपणे सज्ज झाला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक मंत्री आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्सवाची नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे.

राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 साठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला मोठी संधी मिळाली आहे. त्यामुळे महोत्सवाच्या आयोजनात कोणतीही कसर सोडली जाणार नाही. या महोत्सवाच्या माध्यमातून देशभरातील तरुणांना महाराष्ट्राची महान संस्कृती, लोककला आणि वारसाही जाणून घेता येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना विविध कला प्रकारांमध्ये आपली प्रतिभा दाखवण्याची उत्तम संधी मिळणार आहे.