आमदार जानकरांच्या मागणीने दुधाला मिळाले दर





नागपूर, दि. २० डिसेंबर २०२३:- राष्ट्रनायक राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री आमदार मा महादेव जानकर यांच्या सातत्याने दुध दरवाढीच्या मागणीमुळे महाराष्ट्र सरकारने प्रती लिटर दुधात ५ रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र मंत्रिमंडळात पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मंत्री असताना जानकर यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक धोरणात्मक कार्यक्रम राबविले होते. यामध्ये महामेष योजना, शेततळे, दुध दरवाढ अशा अनेक योजनांचा समावेश आहे. मात्र, मंत्री पदाचा कालावधी अपुरा पडल्याने दुधाला ४५ रुपये दर मिळविता आले नाही.

राष्ट्रीय समाज पक्षाची महाराष्ट्र सरकारला प्रती लिटर ४५ रुपये दुधाचे अनुदान देण्याची सातत्याने मागणी होती. या मागणीवरून जानकर यांनी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र सरकार खडबडून जागे झाले आणि दुधाला प्रती लिटर ५ रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

या घोषणेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुधाला दर मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार आहे. तसेच, दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.