हिवाळी अधिवेशन नागपुर :- मराठा समाजातही कमालीची गरिबी आहे, त्यामुळे त्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे हे वास्तव आहे,मात्र ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येऊ नये. त्यासाठी जातीनिहाय जनगणना करावी लागेल आणि सर्व समाजांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करावा लागेल. असे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर यांनी विधानपरिषदेत मागणी केली.
ओबीसींचे हक्क कमी करण्याऐवजी ओबीसी (अ) सारखी यादी तयार करून गरीब मागास मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे.धनगर समाज व इतर समाज जे अनुसूचित जमातीत आहेत त्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळाले पाहिजेत,गरज भासल्यास कोणाच्याही अधिकारांचे उल्लंघन न करता अनुसूचित जमाती (अ) सारखी स्वतंत्र तरतूद करावी.मात्र या सगळ्यावर उपाय केवळ जात जनगणनेतूनच शक्य आहे. आणि आज आपल्या सर्वांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या एका विशिष्ट व्यक्तीला खलनायक ठरवण्याचा जो प्रयत्न तुम्ही सर्व करत आहात तो पूर्णपणे चुकीचा आणि निषेधार्ह आहे.