युवासेनाचे विभागीय सचिव, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांची रुग्णसेवेसाठी थेट नागपुरात धाव


 
चंद्रपूर येथील गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा युवासेना विभागीय सचिव पुर्व विदर्भ प्रा. निलेश बेलखेडे यांना चंद्रपूर दुर्गापूर येथील रुग्ण श्री.बंडू लाकडे हे नागपूर येथील (एम्स) भारतीय विज्ञान केंद्र  नागपुर येथे भरती आहे त्यांना रक्ताची अत्यंत आवश्यकता होती.त्यांनी आपल्या मित्रमंडळींना भ्रमणध्वनीवर नागपुरात रक्तदात्याचा शोध घेतला मात्र त्यांना कुठेही रक्तदाता मिळाले नाही.त्यामुळे त्यांनी आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना भ्रमणध्वनीवर रक्तदाता शोधण्याची विनंती केली.त्यानुसार मित्रमंडळींनी इतरत्र वाॅट्सॲप गृपवर माहीती दिली मात्र कुणाचेही फोन किंवा रक्तदात्याचा संपर्क झाला नाही.प्रा.निलेश बेलखेडे यांना एका मित्राकडून फोन आला त्यांना माहिती मिळताच शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या ब्रिद वाक्यानुसार समाजकार्यात सदैव अग्रेसर त्यांनी नागपूर येथील एम्स मध्ये रक्तदानासाठी धाव घेत माणुसकीचा दर्शन घडविला.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.नियमीत रक्तदान करणे  शरीरासाठी उत्तम असते व रक्त दान हेच श्रेष्ठदान असून सर्वांनी त रक्तदान करत रहावे असे ही यावेळी त्यांनी यावेळी सांगितले