मराठा आंदोलन योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या सहाव्या दिवशी सोमवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आंदोलनाला हिंसक वळण लावले अनेक ठिकाणी जाडपोट केली. यापूर्वी चाललेले आंदोलन हे शांत स्वरूपाचे होते मात्र काही लोक या आंदोलनाचा फायदा घेत हिंसा घडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मराठा आरक्षणासाठी जे काही आंदोलन सुरु आहे त्या बद्दल राज्य सरकार सकारात्मक पाऊल उचलत असून राज्य सरकार आरक्षण देण्या संदर्भात कमिटेड आहे काही लोकं या आंदोलनाचा फायदा घेवून हिंसा करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांना टार्गेट केले जात आहे, या घटनांची गांभीर्याने दखल राज्य सरकारने घेतली असून हिंसक वळण देणाऱ्यांवर कडक कारवाई करु असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.
बिड मध्ये झालेल्या हिंसक वळणात ज्यांची घरे जाळण्यात आले तेव्हा लोकं घरात असताना घरे जाळण्यात आली.घरे जाळताना चे फुटेज मिळाले आहे.त्यामुळे त्या घटनेला जबाबदार व्यक्तीवर जीवे मारण्याचा प्रयत्न असा गंभीर गुन्हा दाखल केला गेला आहे.ज्या वेळेस अशा घटना घडल्या त्यात काही राजकीय पक्षांचे लोकं शामिल आहेत हे देखील आता समोर आले आहे.
ओबीसी नेत्यांना धमक्या
मराठा समाजाला ओबीसी चे आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.जरांगे पाटील यांचे आंदोलन शांततेत चालू असतांनाच सोशल मीडिया व इतर माध्यमातून ओबीसी नेत्यांना धमकी दिली जात आहे .सोशल मिडियावर दिलेल्या धमक्या देखील गांभीर्याने घेतले आहे.पोलीसांनी याकडे गांभिर्याने लक्ष घालण्याचे सांगण्यात आले आहे.