गोशाळेत साजरा केला भोकरे यांनी वाढदिवस
चंद्रपूर येथील विविध सामाजिक क्षेत्रात हिरहिरीने भाग घेणारे हिंदवी स्वराज्य युवा फेडरेशन चे अध्यक्ष मयूर भोकरे यांचा वाढदिवस शहराला लागून असलेल्या लोहारा येथील उज्वल गौरक्षण संस्थेत अत्यंत साध्या पद्धतीने  साजरा करण्यात आला.हिंदवी स्वराज्य युवा फेडरेशन ही संस्था रुग्णसेवा,पुरग्रस्तांच्या मदतीला धावून जाते.जगात आलेल्या महामारी कोरोना काळात या संस्थेने उल्लेखनीय कार्य केले.यावेळी या संस्थेचे शहर अध्यक्ष अमित येरगुडे, प्रफुल्ल बोंबले,गणेश नन्नावरे संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.