चंद्रपूर जिल्हा पोलीस मुख्यालयाला लागुन असलेल्या भवानजी भाई शाळेसमोर अगदी हाकेच्या अंतरावर १०० मीटरच्या आत ब्लू पॅराडाईस बार ॲड रेस्टॉरंट आहे.शाळेतील मुलींना या ठिकाणी वाईट परीणाम होत असून तेथील मद्यपीमुळे मुलींना छेडछाड होत असल्याची चर्चा नागरीकांत सूरू आहे. तसेच बार अॅन्ड रेस्टारेंन्टचे परवाना देतांना नियमाप्रमाणे शाळा, विद्यालय, मंदीर, हॉस्पीटल च्या १०० मिटरच्या बाहेर असायला पाहिजे मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने या बारला कोणत्या आधारे परवानगी दिली हे कळलेच नाही.ब्लु पॅराडाईस बार ॲड रेस्टॉरंट हे शाळेच्या अगदी ५० मिटर अंतरावर आहे.त्यामुळे अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून काम केल्याचे दिसत आहे.
ब्लू पॅराडाईस बारला लागुनच एकीकडे हॉस्पीटल आहे तर दुसरीकडे भवानजीभाई विद्यालय आहे असे असतांना सुद्धा बार करीता परवाना देने हे नियमांचे उल्लघन झाले असून सदर बार रेस्टॉरेन्ट चा परवाना तात्काळ रद्द करून बार रेस्टारेन्ट बंद करण्यात यावे अशी मागणी केंद्रीय मानव अधिकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.तात्काळ बंद न केल्यास राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.