जनसंवाद पदयात्रेतून सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडलीचंद्रपूर : जनसामान्यांच्या आक्रोश २०२४ मध्ये प्रत्यक्ष मतदानात उतरून हे हुकूमशाही सरकार जनता पाडेल. बेबंदशाहीचे सरकार पडल्याशिवाय लोकशाही जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार सत्तापालट करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. 
दुर्गापूर - ऊर्जानगर क्षेत्रात इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती यांच्या नेतृत्वात जनसंवाद यात्रा काढण्यात आली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. 


याप्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती ऊर्जानगर सरपंच मंजूषा येरगुडे, दुर्गापूर सरपंच पूजा मानकर, सागर तुरक, बाळू चांदेकर, मुन्ना आवळे, युनियन नेते शंकर खत्री, ग्रामपंचायत सदस्य आवळे, ग्रामपंचायत सदस्य साहिली देठे, ग्रामपंचायत सदस्य ईरपाते ताई ग्रामपंचायत सदस्य सारिका कावळे ग्रामपंचायत सदस्य रंगारी, आलोक चवरे, रवि दुर्गे, साबीर शेख, साहिल शेख, मन्नु यांची उपस्थिती होती. 


पुढे बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाले कि, २ कोटी बेरोजगारांना रोजगार, १५ लाख रुपये जनतेच्या खात्यावर पाठविणार, शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल अशा अनेक घोषणा सत्ताप्राप्ती साठी  मोदी सरकारने केल्या होत्या. परंतु आता महागाईच्या फटका जनतेला सोसावा लागत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार बदलून सर्वसामान्यांचे काँग्रेस सरकार आणण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.