त्या इलेक्ट्रिक कंत्राटदारामुळे युवकाची प्रकृती चिंताजनक Due to that electrical contractor, the condition of the youth is alarming



मुल तालुक्यातील जुनासुर्ला Junasurla in Mul taluka येथील बाजार चौकात इलेक्ट्रिक खांब व तार दुरुस्ती Electric pole and wire repairकरून त्यावर नवीन तार व खांब टाकण्याचे काम सुरू आहे.तार टाकण्यात अडचण निर्माण होत असलेल्या चिंचेचे झाडाच्या फांद्या अर्धवट तोडून ठेवले. ती फांदी एका युवकाच्या अंगावर पडल्याने जिवावर बेतले आहे.सध्या ते युवक जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.कंत्राटदावर व लाईनमन वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.


जुनासुर्ला येथील बाजार चौकात इलेक्ट्रिक खांब व तार दुरुस्ती करून त्यावर नवीन तार टाकण्याचे काम सुरू आहे. तारांना अडचण निर्माण करीत असलेल्या चिंचेच्या झाडांचे अर्धवट फांद्या कंत्राटदारांनी दि.८/९/२०२३ रोजी तोंडुन ठेवले.यावेळी लाईनमन स्वतः उपस्थित राहुन काम करवून घेत होते.मात्र लाईनमनच्या दुर्लक्षामुळे एका युवकांचा जिव धोक्यात आहे.त्या फांद्या घरगुती वापरासाठी कैलास मडावी व अन्य दोनजण हे सकाळी घटनेच्या ठिकाणी काम करीत होते.कैलास यांने त्या फांद्या जमीनीवरून खिचण्याचा प्रयत्न केला मात्र त्या फांद्या अर्धवट तोडून ठेवल्याने ती फांदी कैलासच्या डोक्यावर व छातीवर पडली.त्यामुळे कैलास ला गंभीर दुखापत झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या कैलास जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे.


जुनासूर्ला येथे शनीवारी आठवडी बाजार असते मात्र ही घटना सकाळीच घटल्याने खुप मोठा अनर्थ टळला.वास्तवीकता कंत्राटदाराने पुर्णतः फांदी तोडायला पाहिजे होते.मात्र कंत्राटदारांनी अर्धवट काम करून ठेवल्याने त्या युवकाच्या जिवावर बेतले आहे.याला सर्व कारणीभूत कंत्राटदार लाईनमन असल्याने कंत्राटदारावर व लाईनमन वर फौजदारी कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा समस्त ग्रामस्थांनी आंदोलन करण्याची तयारी दाखवली आहे.