मुल तालुक्यातील जुनासुर्ला हे राजकिय दृष्ट्या संवेदनशील आहे. अश्या संवेदनशील गावात ग्रामपंचायतीचा अफलातून कारभाराने सध्या विविध चर्चेला पेव फुटले आहे.नैसर्गीक आपत्ती ने जुनासुर्ला गावातील काही घरे अस्ताव्यस्त झाली.मात्र त्याही ठिकाणी टाळु वरची लोणी खाण्याचा प्रयत्न ग्राम पंचायत ने केल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे .
प्राप्त माहितीनुसार मुल तालुक्यातील जुनासुर्ला गावाला जुलै ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगले झोडपले.अनेकांच्या घरात पाणी घुसले लाखो रुपयांचा नुकसान झाला.अनेकांना काही दिवस आपल्या घराबाहेर राहावे लागले .अश्या लोकांना शासनातर्फे प्रत्येक कुटूंब १० हजार रुपये मंजूर केले मात्र जुनासुर्लामध्ये ज्यांचे घरे पाण्याखाली गेले त्यांना काही अंशी देण्यात आले तर काहींचे घरे पाण्याखाली न जाता त्यांना शासनातर्फे मंजुर असलेल्या निधी देण्यात आला.
मात्र ज्यांची घरे खरोखरच पाण्याखाली गेले त्यांना मात्र भोपळा मिळाल्याची माहिती गावकऱ्यांकडून मिळाली आहे.ज्यांची घरे पाण्याखाली गेले नाही त्यांना निधी मिळाल्याने स्थानिकांनी पुरग्रस्त उपाशी तर अपुरग्रस्त तुपाशी असल्याचे आजच्या ग्रामसभेच्या माध्यमातून दिसून आले.विरोधी पक्षाच्या काही ग्राम पंचायत सदस्यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा प्रश्न उपस्थित केल्याने ग्रामसेवकांची संरपंचाची चांगलीच पळती भुई झाल्याचे कळले.ग्राम सदस्यांनी उचललेल्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी चांगलाच धडा घेतल्याचे दिसते.
नुकताच ग्राम पंचायत उपसरपंच पदांची निवडणूक झाली त्यातील माजी उपसरपंचानेसुध्दा हा मुद्दा ऐरणीवर धरल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे.या ठिकाणी झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे काम करणार असल्याचे सुत्राव्दारे सांगण्यात आले आहे.