सिटीपीएस प्रशासन विरोधात कामगारांचे आमरण उपोषण Workers strike to death against CityPS administrationचंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मधील सि.एच.पी
CHP in Chandrapur Thermal Power Station.अंतर्गत येत असलेला पाईप कन्व्हअर बेल्ट Pipe Conveyor Belt वरील समस्त कामगार सदर में थायसन कृप, इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (पेटी कंत्राटदार) या कंपनीकडे कार्यरत असताना दि. १६ मार्च २०२३ पासुन या सर्व कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता सुरू असलेल्या कामावरून अचानक बंद करण्यात आले आहे.त्यामुळे मागील चार महिण्यापेक्षा जास्तीचा कालावधी झाला त्यामुळे सर्व कामगार तसेच कामगारांच्या संपुर्ण परिवारावर उपासमारीची पाळी आलेली आहे.त्यामुळे कामगारांना दि.९ ऑगस्ट या क्रांती दिनापासून आमरण उपोषणाला Fasting to death बसावे लागले आहे.


पाईप कन्व्हअर बेल्ट बाबत सतत पत्र व्यवहार करून पाठपुरावा करून सुध्दा हा प्रश्न निकाली लावण्यात सि.एस. टी. पी. एस. प्रशासनाकडून सातत्याने अपयश प्राप्त झाले आहे. पाईप कन्व्हेअर बेल्ट येथील कामगार यांच्या मनामध्ये प्रचलीत व्यवस्थेयावत चिन्ह निर्माण झालेला आहे.त्यामुळे येथील कामगारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. सि.एस.टी.पी.एस. प्रशासनानी कामगारांना कामावर न घेतल्याने उपासमारी चे चटके सोसावे लागत आहे.
कामगारांच्या प्रश्नाबाबत मा. व्यवस्थापकीय संचालक मुंबई यांची शिवसेना (उबाठा) प्रणित महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कंत्राटी कर्मचारी सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती.त्यात अमरावतचे वासीक शेख, जिल्हा सचिव अमोल मेश्राम, प्रफुल्ल सागोरे, प्रमोद कोलारकर, गजानन दुरटकर,आदींचा समावेश होता.संचालकांनी कामगारांना पुर्ववत कामावर रुजू करून घेऊ असे आश्वासन दिले मात्र दोन महीण्याचा कालावधी लोटला असतांनाही कामावर रुजू करून घेतले नाही.त्यामुळे कामगारांना आमरण उपोषणाला बसावे लागले.या आमरण उपोषणाला गजानन शंकर दुरटकर, संतोष भाऊराव थेटे हे बसले आहेत.आमरण उपोषणाचा दुसरा दिवस असतांनाही प्रशासनाने दखल घेतली नाही.प्रशासनाने दखल न घेतल्यास लढा तीव्र करण्यात येईल असा इशारा जिल्हा सचिव अमोल मेश्राम यांनी केले आहे.