जुनासुर्ला परीसरात वाघाचा धुमाकूळ Tiger's roar in Junasurla areaमुल तालुक्यातील जुनासुर्ला ,गडीसुर्ला,विरई, फिस्कुटी Junasurla, Gadisurla, Virai, Fiskuti in Mul taluka भागात वाघाने धुमाकूळ घातला आहे.आज दुपारी जूनासुर्ला येथिल प्रविण खोब्रागडे यांच्या शेतात रानडुक्कराची शिकार केल्याचे दिसले.यापुर्वीही एका मेंढपाळाच्या मेंढ्याचा कळप डोंगराच्या कडेला मेंढ्या चरत असतांना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घालण्यापुर्वीच मेंढपाळाच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला त्यामुळे वाघ पळून गेला होता.यात मोठी जिवीतहानी टळली.

पुन्हा त्या वाघाचा वावर या भागात असल्याचे स्पष्ट झाले आहे.सदर घटनेची माहीती जुनासुर्ला गावातील प्रथम नागरिक संरपंच रणजीत समर्थ यांना दिली असता त्यांनी क्षणाची विलंब न लावता वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तात्काळ बोलावून घेतले,सदर घटनेचा पंचनामा करून ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे.दोन वाघ असल्याचे वाघाच्या ठस्सावरून दिसत असल्याचे वनाधिकारीनी सांगितले आहे.त्यामुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आली आहे.त्या वाघांना लवकरात लवकर जेरबंद करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ मुख्य महासचिव संजय कन्नावार यांनी केली आहे