पुणे येथील रासप मेळाव्याला विदर्भातून जाणार हजारो कार्यकर्ते Thousands of activists will go from Vidarbha to the RASAP meeting in Puneनागपूर:- राष्ट्रीय समाज पक्षाचे वर्धापन दिना Anniversary of Rashtriya Samaj Party पुणे येथील गणेश कला क्रीडा मंडळ स्वारगेट येथे मंगळवार दि.२९ ऑगस्ट २०२३ रोजी देशभरातून लाखो रासप सैनिक हजर होणार आहेत.या वर्धापनदिनी राष्ट्रनायक राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर Rashtranayak National President MLA Mahadevrao Jankarसाहेब यांच्या उपस्थितीत पुढील राजकिय वाटचालीची घोषणा करण्यात येणार आहे.
वर्धापन दिन सोहळा दरवर्षी वेगवेगळ्या राज्यात केल्या जातो.यावर्षी महाराष्ट्रात होत असल्याने राजकारणाच्या भुवया उंचावल्या आहेत.या सोहळ्यात महादेव जानकर काय बोलणार याकडे राजकारण्यांचे लक्ष लागून आहे.या सोहळ्याला विदर्भातून हजारों कार्यकर्त्याचा जथ्था जाणार असून त्या दृष्टीने कार्यकर्ते कामाला लागले आहेत.राष्र्टीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ (नाना)शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर यांचे आदेशानुसार विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा रमेश पिसे,विदर्भ मुख्य महासचिव संजय कन्नावार, डॉ तौसिफ शेख, स्वरुप रामटेके व इतर पदाधिकारी यांच्या नेतृत्वात विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.