गोळीबार प्रकरणातील त्या आरोपींना अटक Those accused in the shooting case were arrested



चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा Rajura in Chandrapur district येथे अंधाधुंद गोळीबार केला त्यात भाजयुमो नेते सचिन डोहे BJP leader Sachin Dohe ह्यांची पत्नी पूर्वशा हीचा जागीच मृत्यू झाला होता तर एका व्यक्तीच्या पाठीला गोळी लागल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते. पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत नवज्योतसिंह या मुख्य आरोपीसह अन्य एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

राजुरा येथील सोमनाथपूर वॉर्ड येथे राहणाऱ्या लल्ली नामक व्यक्तीला वैयक्तिक शत्रुत्वातून मारण्यासाठी अज्ञात व्यक्ती शहरात आले होते. ही बाब लल्ली ह्यांच्या लक्षात येताच तो रात्री 8 ते 8:30 च्या दरम्यान भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे ह्यांच्या घरात शिरला. तेव्हा मागावर असलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. नेमक्या त्याच वेळी पूर्वशा डोहे अंगणात आल्याने त्यांना छातीत गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर लल्लीच्या पाठीला गोळी लागल्याने उपचार सुरू आहे..
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा पोलीसांनी तपास चक्रे वेगाने फिरवीत मुख्य आरोपी नवज्योतसिंह सह एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे.