घोडाझरीत चार युवकांचा मृत्यू,सेल्फीने केला घात Four youths died in Ghodazari, suicide attackनागभीड:- नागभीड Nagbhir   तालुक्यातील प्रसिध्द घोडाझरी तलावाचे सौंदर्यीकरण Beautification of Ghodazari Lakeबघण्यासाठी वरोरा तालुक्यातील शेगाव  येथील युवक पर्यटनासाठी गेले होते.सेल्फी काढतांना एकाचा पाय घसरला त्याला वाचविण्यासाठी गेले असता चार युवकांचा मृत्यू झाला. गेल्या ३-४ दिवसापासून सतत पाऊस येत असल्यामुळे घोडाझरी तलावात सभोवताली असलेल्या डोंगरदऱ्यातून भरपूर पाणी आले आहे.
घोडाझरीचे तलावाचे सौंदर्य बघण्यासाठी वरोरा तालुक्यातील शेगाव येथील ८ युवक आले. सौदर्यीकरणाचे मोह न आवरल्याने सेल्फी काढण्याच्या नादात एकाच पाय घसरला.त्याला पकडण्यासाठी 3 युवकही पडले.आलेल्या ८ पैकी ४ युवक बुडाले.त्यात मनीष श्रीरामे (२६), धीरज झाडें (२७), संकेत मोडक (२५), चेतन मांदाडे ( १७ ),यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नागभीड येथील पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून त्यांचे शोध मोहीम सुरू असल्याची माहिती आहे