सासऱ्याने चाकुच्या धाकावर केला सुनेचा अत्याचार The father-in-law raped the daughter-in-law at the point of knifeमाजरी :-भद्रावती तालुक्यातील माजरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत Within the limits of Majri Police Station in Bhadravati Taluka घरी कोणी नसल्याची संधी साधून ६० वर्षीय सासऱ्याने चाकूचा धाक दाखवून २२ वर्षीय सुनेवर अत्याचार Abuse of daughter-in-law केल्याची घटना ९ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, भीतीने आणि बदनामीपोटी तिने तक्रार दिली नव्हती. परंतु, सासऱ्याकडून वारंवार धमक्या दिल्या जात असल्याने तिने शनिवारी माजरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपी सासऱ्याला अटक करण्यात आली आहे.पीडिता ही २२ वर्षीय असून, २०१९ मध्ये तिचे लग्न झाले. नवरा व दिर रात्रीचा पाळीत कामावर जात असल्याने घरी आजारी सासू, सासरा व मुलांसोबत ती राहते. ९ जुलेरोजी रोजी सासऱ्याने सुनेला घरी एकटे पाहून रात्रीच्या १२ वाजताच्या दरम्यान टीव्हीचा आवाज वाढविलाआणि चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला. सकाळी तिने अत्याचाराची माहिती नवऱ्याला व दिराला दिली. परंतु, परिवाराची बदनामी होईल असे सांगून गप्प राहण्यास सांगितले. दरम्यान हा प्रकार उघड न करण्यासाठी सासऱ्याकडून धमक्या दिल्या जात होत्या. 


या घटनेने पीडित सुनेला मानसिक धक्का बसला. अखेर सुनेने मानसिक धक्क्यातून सावरल्यानंतर १५ जुलैला माजरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने माजरीमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी सासऱ्याविरुद्ध कलम ३७६, ३७६ (२) (फ) भादवी अन्वये गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजितसिंग देवरे, पीएसआय भोजराम लांजेवार, माणिक पावडे, अविनाश राठोड हे करीत आहेत