चंद्रपूर : मागील 5 वर्षापासून रेंगाळत असलेल्या खेडी गोंडपिपरी पोडसा Khedi Gondpipri Podsa मार्गाच्या बांधकामासाठी रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले. त्याचे मटेरियल रस्त्यावर पडून असल्याने नुकत्याच झालेल्या पावासाचे पाणी नागरिकाच्या घरात घुसले. रस्ता खोदकामात निघालेला मटेरियल रस्त्याच्या कडेला टाकल्याने गेल्या दोन वर्षांपासून जुनासुर्ला गावात तीनदा पुर आलेला आहे. त्यामुळे नागरीकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र याकडे लक्ष देण्यास पालकमंत्री महोदयांना वेळच नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
नुकताच बेंबाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटनासाठी त्याच गावावरून पालकमंत्री आणि त्यांचा ताफा गेला. मात्र, पालकमंत्र्यांना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यानी पूराची माहिती दिली नाही की माहिती असून, पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केले, असा सभ्रम निर्माण होते आहे.
पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार Guardian Minister Sudhir Mungantiwarयांच्या मतदारसंघातील गाव असतांनाही त्या गावाकडे उदासीन दाखविण्यात येत आहे. त्याच्याच मतदार संघात पालकमंत्र्यांना वेळच नाही. याकडे अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रस्ता बांधकामांचे तिनं तेरा वाजले आहेत.