चंद्रपूर:- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नकोडा (घुग्गुस)येथील विद्यार्थ्यांनी प्लास्टिक संकलनाचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.खाली प्लास्टिकच्या बॉटल मध्ये प्लास्टिक पिशवी,चॉकलेट-बिस्कीट इ. रॅपर भरण्याचा हा उपक्रमातून ज्ञानार्जनाचा अनोखा प्रयोग आता ग्रामपंचायत परिसरात चर्चेचा ठरला आहे.या विद्यार्थ्यांचे गावकरी कौतुक करीत आहेत.
शासनाने आता नवीन शिक्षण पद्धती आणण्याचा विचार सुरू केला आहे.उपक्रम व मातृभाषेतून शिक्षण झाले तर मुलांच्या बुद्धीचा विकास झटपट होतो असे मत शिक्षणतज्ञांनी अलीकडे मांडले असतांना शासन या तत्वावर कार्य करीत आहे.विद्यार्थ्यांना सर्व बाबतीत ज्ञानसंपन्न करून विकसित करण्याची जवाबदारी प्रथमतः प्राथमिक शाळेत शिक्षकांची आहे.यात पर्यावरण संरक्षण हा विषय देखील महत्वाचा आहे.त्यामुळे जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळा नकोडा (घुग्गुस) येथील सहायक शिक्षिका श्रद्धा भुसारी यांनी शक्कल लढवीत विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान समजवून,प्लास्टिक संकलनासाठी प्रोत्साहित केले.रिकाम्या प्लास्टिक बॉटल मध्ये प्लास्टिकच्या पिशव्या,चॉकलेट-बिस्किटचे रॅपर भरून ते कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीला दिले तर गाव प्लास्टिक कचरामुक्त होऊ शकते हे पोटतिडकीने समजवून सांगितले.आणि बघता बघता हे विदयार्थी प्लास्टिक बाटलीबंद करून आणून देऊ लागले.उपक्रमातून प्लास्टिक संकलनाची व पर्यवरण रक्षणाची ही कल्पना आता पालकांतही रूढ होत आहे.
उपक्रमातून अर्थार्जन,बच्चे कम्पनी खुश
प्लास्टिक संकलनाच्या या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा म्हणून प्लस्टिक बॉटल वेस्ट प्लॅस्टिकने भरून आणणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति बॉटल 5 रुपयांचे बक्षीस दिले जाते.यामुळे स्तुत्य उपक्रमातून अर्थार्जन करण्याची कला हे विद्यार्थी शिकत आहेत.उपक्रमातून अर्थार्जन होत असल्याने बच्चे कम्पनी खुश आहे.
बालमनावर योग्य संस्कार व्हावे म्हणून उपक्रम
श्रद्धा भुसारी
सहा.शिक्षिका
जीप उच्चप्राथमिक शाळा,नकोडा(घुग्गुस)
बालमनावर केलेले संस्कार चिरकाळ टिकतात.त्यामुळे शिक्षकांची भूमिका अत्यन्त महत्वाची आहे.शालेय शिक्षण घेत असतांना सामाजिक जवाबदारीचे शिक्षण महत्वाचे आहे.ते योग्य झाले तरच उद्याचा जागरूक नागरिक घडू शकतो.पर्यावरणाला आज प्लास्टिक पासून सर्वाधिक नुकसान आहे. पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येकाची जवाबदारी आहे.याचे ज्ञान आमच्या विद्यार्थ्यांना असावे म्हणून हा उपक्रम राबवित आहे.कारणकी,बालमनावर झालेले संस्कार चिरकाळ टिकतात.