मुंबई :- राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आजपासून अहील्यादेवी होळकर चौक चर्चगेट येथून जनस्वराज्य यात्रा सुरू करण्यात आली मात्र अंधेरी भागातील दहीसर येथे जनस्वराज्य यात्रा पोहचली असता पोलीसांनी रोखली ही यात्रा रोखली आहे.अहील्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील अहील्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळापासून महाराष्ट्रात जनस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे.या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने जनस्वराज्य यात्रेचा धसका अनेकांनी घेतल्याचे दिसत आहे.राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर हे स्वतः या जनस्वराज्य यात्रेत सहभागी झालेले असून अंधेरी पोलीसांनी ही यात्रा रोखली आहे.