चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन Chandrapur Thermal Power Station चे मुख्य अभियंता श्री पंकज सपाटे यांची बदली मुख्यालयात झाली असून, त्यांच्या जागी श्री.गिरीश कुमारवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गिरीश कुमारवार हे मुंबई मुख्य कार्यालयातील मुख्य अभियंता (मध्यवर्ती खरेदी कक्ष ) Chief Engineer (Central Purchase Room)या पदावर कार्यरत होते.
पंकज सपाटे यांची वर्षभरापुर्वीच कार्यकारी संचालक पदावर नियुक्ती झाली आहे. सतत दौऱ्यावर असल्याकारणाने त्यांचे चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन कडे दुर्लक्ष झाले होते. गेल्या महीण्याभरापासून त्यांची चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मध्ये सुट्टीच्या दिवसांतच हजेरी होती. त्यामुळे महत्वाच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत होते.
नवनियुक्त गिरीश कुमारवार हे यवतमाळ जिल्ह्यातील आहेत.मुख्य अभियंता पदांची सुत्रे सोमवारी हाती घेणार असल्याचे कळते.