मुल तालुक्यातील जुनासुर्ला येथील प्रतीकार नागरी सहकारी पतसंस्था ही गेल्या विस वर्षापुर्वी संस्थेची स्थापना करण्यात आली. भाड्याच्या घरात असलेली संस्था आज स्वताच्या पायावर उभी असून स्वतंत्र इमारत उभी केली आहे.त्याचे औचित्य साधून दि. ८एप्रिल २०२३ रोजी दुपारी १ वाजता जुनासुर्ला येथे उभारलेल्या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा व त्यानिमीत्त सहकार मेळावा आयोजित केलेला आहे.या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटक मा. नाम सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने सास्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मरा तथा पालकमंत्री चंद्रपूर हे राहणार असून अध्यक्ष म्हणून मा. हंसराजभैय्या अहीर,अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग भारत सरकार तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री,तर विशेष अतिथी मा. देवराव भाऊ भोंगळे, माजी अध्यक्ष जि.प,मा. हरीष भैय्या शर्मा, माजी नगराध्यक्ष बल्लारपूर ,मा. संध्याताई गुरनुले, माजी अध्यक्ष जि.प.चंद्रपूर,मा. प्रकाश पा मारकवार,माजी जि.प.चंद्रपूर,मा. प्रशांत धोटे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर,मा. विनोदभाऊ अहीरकर, मा. घनश्यामभाऊ येनुरकर, माजी सभापती कृउबा समिती मूल,मा. प्रभाकरभाऊ भोयर,मा.राकेशभाऊ रत्नावार,मा. अमोल पा.चुदरी,मा.संजयभाऊ येनुरकर, मा.रणजीत समर्थ सरपंच ग्रा.प.जुनासुर्ला व इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.या लोकार्पण सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे.