मोठी बातमी:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द Big news:- National status of NCP party cancelledनवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा Nationalist Congress Partyराष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने Central Election Commission याबाबतचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच Nationalist Congress Partyतृणमूल काँग्रेस आणि सीपीआय Trinamool Congress and CPI या तीनही पक्षांचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1998 साली झाली होती. तेव्हापासून सलग 15 वर्ष हा पक्ष राज्यात सत्तेत होता. तसेच या पक्षाने देशाच्या राजकारणातही ठसा उमटवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार NCP President Sharad Pawar हे एकेकाळी देशाचे केंद्रीय कृषीमंत्रीदेखील होते. असं असताना निवडणूक आयोगाने आज राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत घेतलेल्या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी काळातील राजकारण आणि निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या तीनही पक्षांची राष्ट्रीय मान्यता रद्द केल्याचा अहवाल दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला एकप्रकारे प्रमोशन दिल्यासारखा निर्णय घेतला आहे. कारण निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला Aam Aadmi Party केंद्रीय पक्षाचा दर्जा Central party statusदिला आहे.

दुसरीकडे महाराष्ट्राचा विचार केला तर शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. राष्ट्रवादीचे लोकसभा आणि राज्यसभेत खासदार आहेत. याशिवाय नागालँडमध्ये त्यांचे अनेक उमेदवार निवडून आले आहेत. पण असं असताना निवडणूक आयोगाने त्यांची केंद्रीय पक्ष म्हणूनची मान्यता रद्द केली आहे.