राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आ.महादेव जानकर साहेब,प्रदेश अध्यक्ष काशिनाथ (नाना )शेवते व प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर यांचे आदेशानुसार अमरावती विभागातील, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यातील रासप कारकर्त्याची रविवार दिनांक 12मार्च 23रोजी दुपारी 1:00 वा. " शासकीय विश्रामगृह अमरावती " येथे रासपचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. ऍड. रमेश पिसे यांचे अध्यक्षतेत अमरावती विभागातील आढावा बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीत अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भाने पक्षाची रणनीती ठरणार असून पक्ष बांधणी मजबूत करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. ऍड. रमेश पिसे, विदर्भ संपर्क प्रमुख कृषी सम्राट राजेंद्र पाटील, विदर्भ प्रदेश मुख्य महासचिव संजय कन्नावार ,विदर्भ कोषाध्यक्ष पुरुषोत्तम कामडी, डॉ, तोशिफ शेख, डॉ. प्रमोद पाथुर्डे आदी मान्यवर बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. तरी अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यातील रासप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे जाहीर अवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने करण्यात आले आहे.