मुंबई: राज्यात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाकडून आजपासून म्हणजे 14 मार्चपासून ते 18 मार्चपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मागील पंधरवड्यात दुसऱ्यांदा अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याचा अंदाज आहे.
Unseasonal Rain: हवामान खात्याचा अंदाज काय?
आज नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
15 मार्च रोजी धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद आणि जालन्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
16 मार्च रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
16 मार्च रोजी महाराष्ट्रात कोकणासह सर्वत्रच पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
16 मार्च रोजी जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
16 मार्च रोजी अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.