चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या मेजर गेट समोर रयतेचे राजे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसेनेच्या तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली.भारतीय कामगार सेना संलग्न महाराष्ट्र राज्य सुरक्षा व कंत्राटी कर्मचारी सेनेचे जिल्हा सचिव अमोल मेश्राम यांच्या नेतृत्वात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या प्रमुख हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख प्रमोद पाटील,मा.नगरसेवक सुरेश पचारे, पुर्व विदर्भ विभागीय सचिव तथा सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ निलेश बेलखेडे,वसीम शेख,ग्राम सदस्य तथा जिल्हा सहसचिव संजोग अडबाले,शाखा अध्यक्ष प्रफुल्ल सागोरे, शाखा सचिव प्रमोद कोलारकर,शाखा उपाध्यक्ष विक्रम जोगी, शाखा सहसचिव अक्षय मेश्राम, पंकज इंगोले, रिचर्ड राॅड्रीक्स,मार्शल नक्षीणे,अमोल भट आदी उपस्थित होते.
या शिवजन्मोत्सव कार्यक्रमानिमीत्त उपस्थीतांना पेढे व अल्पोपहार वाटप करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.