विदर्भातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीबाबत राष्ट्रीय समाज पक्षाची रणनीती ठरवून पक्ष बांधणी मजबूत करून विदर्भातील सर्व जिल्ह्यातील रासप कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करण्याकरीता रासपचे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ (नाना) शेवते यांचे खंबीर नेतृत्वात व प्रमुख मार्गदर्शनात शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी2023 पासून ते 01 मार्च 2023पर्यंत विदर्भातील पूर्व नियोजित जिल्हास्तरीय आढावा बैठका आयोजित केल्या आहेत. त्यानुसार आज चंद्रपूर येथील वन विश्रामगृह रामबाग,माता मंदिर च्या मागे मुलं रोड चंद्रपूर येथे सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे. तर गडचिरोली येथील स्थानिक विश्रामगृह गांधी चौक येथे दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीला मार्गदर्शन करण्याकरीता रासपचे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ (नाना) शेवते यांच्या समवेत प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली )सलगर, विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रा. एड.रमेश पिसे, विदर्भ प्रदेश संपर्क प्रमुख कृषी सम्राट राजेंद्र पाटील, विदर्भ प्रदेश मुख्य महासचिव संजय कन्नावार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला विदर्भातील सर्व जिल्ह्यातील रासप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा पदाधिकार्यांनी केली आहे.