अन् पालकमंत्र्यांनी घेतली सिटीपिएसच्या त्या कन्व्हटर बेल्टची दखल !




चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये Chandrapur Thermal Power Stationउर्जा निर्मिती साठी कोळसा पुरवठा आसपास खाणीतून केल्या जातो. ते कोळसा पाॅवर स्टेशन पर्यंत पोहचविण्यासाठी कन्व्हटर बेल्टचा Converter belt वापर केला जातो.त्या बेल्ट साठी करोडो रुपये खर्च केले जातात.याच बेल्टसाठी थायसन व भावना Thyson and Bhavna या कंपनीला करोडो रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.आता नुकताच कोळसा वाहून नेण्याचे कामे चालू असतांनाच कन्व्हटर बेल्ट तुटल्याने करोडो रुपयांचे नुकसान शासनाचे झाले असल्याचे तक्रार सुधिर मुनगंटीवार मंत्री वने सांस्कृतिक कार्य मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री Sudhir Mungantiwar Minister of Forests Cultural Affairs Fisheries and Guardian Minister यांच्याकडे शिवसेना कामगार सेनेचे जिल्हा सचिव अमोल मेश्राम यांनी केली असून त्याची दखल घेत चौकशीचे पत्र दिले आहे.



थायसन व भावना या कंपनीने करोडो रुपयांच्या कन्व्हटर बेल्टवर थातूरमातूर कामे करण्यात आली आहे.त्यामुळे कंत्राटाची मुदत संपण्यापूर्वीच बेल्ट तुटल्याने कोळसा वाहून नेण्याचे काम बंद पडले आहे.त्यामुळे विज निर्मिती खंडीत पडली आहे.या बेल्टच्या देखरेखीसाठी महाजनकोचे अधिकारी कर्मचारी व कंपणीचे कर्मचारी कार्यरत असतात त्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यानेच हा अनर्थ घडला आहे.



थायसन व भावना कंपणीनी लावलेल्या करोडो रुपयांच्या कन्व्हटर बेल्टची सखोल चौकशी करावी, कन्व्हटर बेल्टची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी,थायसन व भावना कंपणीला काळ्या यादीत टाकण्यात यावा, वरीष्ठ स्तरावरून चौकशी करावी व दोषीवर १० दिवसांत कार्यवाही करावी अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारासुध्दा त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.