चांदा क्लब ग्राउंड येथे 4 मार्च ला सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन Organized interfaith mass wedding ceremony on 4th March at Chanda Club Ground





चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राउंड Chanda Club Ground येथे 4 मार्च ला सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सहायक धर्मादाय आयुक्त चंद्रपुर,Assistant Charity Commissioner Chandrapur, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिती चंद्रपुर यांच्या सौजन्याने हा सामूहिक विवाह सोहळा येत्या 4 मार्च ला चांदा क्लब ग्राउंडवर पार पडणार असून जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत धर्मदाय सहआयुक्त श्रीमती ए. एस. कोल्हे व आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.



या सामूहिक विवाह सोहळ्यात गरीब, आत्महत्या ग्रस्त, आर्थिक दुर्बल, घटस्फोटित,शेतकरी, शेतमजूर, मजूर, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती,इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक व इतर सर्व घटकांतील मुलामुलींचे लग्न लावून देण्यात येणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत वर वधूच्या पालकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आलें आहे.तसेच विवाहासाठी आधार कार्ड, जन्मतारखेचा दाखला,रहीवासी दाखला, यापूर्वी लग्न झालेले नसल्याचे प्रमाणपत्र, लग्न स्वेच्छेने करीत असल्याचे संमतीपत्र आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन येण्याचे कळविण्यात आले आहे.


या विवाह सोहळ्यात वर वधूंना लग्नाचे कपडे फेटा, ओढणी, अलंकार व गृहपयोगी वस्तू देऊन नोंदणीकृत प्रमाणपत्रासह व्यवस्थीपणे बिंदी करून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.या पत्रकार परीषदेला मनीष महाराज, कैलास खंडेलवाल, रामदास वाघदरकर, अँड राजेश्वर ढोक,हरविदंरसिंग धुन्ना, सुनिल दहेगावकर,निरीक्षक आर एस मडावी आदी उपस्थित होते.